
दैनिक चालु वार्ता
पालघर प्रतिनिधी
अनंता टोपले
बेरीस्ते गावातील अनाजी भिका राऊत यांच्या घरास आग लागून संसार उपयोगी साहित्य व कागदपत्रे जळून खाक!
ह्या गरीब कुटुंबाची कोणी मदत करेल का?
मोखाडा :- दिनांक ७ फेब्रुवारी २०२२ रोजी अनाजी भिका राऊत यांच्या राहत्या घराला अचानक आग लागली. कुटुंबातील सर्व सद्यस् कामासाठी बाहेर गेले होत. घरात कुणी नसल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. अनाजी राऊत यांनी स्वतः आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीत काही रोख रक्कम,धान्य साठा व दैनंदिन वापराच्या सर्व वस्तू भस्मसात झाल्या.अनाजी राऊत यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आगीत पुर्ण संसार उध्वस्त झाला. यामुळे पूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे.पालघर जिल्ह्यात अनेक सामाजिक संस्था आहेत पण मात्र ह्या गरीब कुटुंबाच दुःख एकाही संस्थेला-संघटनेला किव्हा राजकीय नेत्यांनाही दिसत नाही का असा सवाल अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे.