
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार आज (11 मार्च रोजी) विधीमंडळात महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विधीमंडळात येत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.