
दैनिक चालु वार्ता
मोलगी प्रतिनिधी
अॅन्ड रविंद्र पाडवी
मोलगी :- मा. डॉ. मैनक घोष, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा यांच्या दुरदृष्टीने आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जातीचे दाखले काढण्यासाठी तालुक्याला हेलपाटे मारावे लागू नये म्हणून आश्रम शाळेतच विद्यार्थ्यांना जातीचे दाखले देण्याची महत्वकांक्षी योजना राबवण्यात आली. त्याअंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, भांगरापाणी ता. अक्कलकुवा जि.नंदुरबार येथे जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून विद्यार्थीनींना जातीचे दाखले वाटप करण्यात आले.
त्या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.पी.सी. वसावे, श्री.अभयकुमार साळवे,श्री.गुलाबसिंग वळवी,श्री.संजय अहिरे,श्री. अविनाश वसावे,श्री.दलपत पाडवी,श्री.रोहीदास पाडवी, श्री.तिरसिंग वसावे,श्री. जगदिश पाडवी,श्री.विक्रांत नाईक,श्री.वसंत पाडवी,श्रीम.आनंदी वळवी, श्रीम.रिना तडवी,श्रीम. लक्ष्मी वळवी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.