
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
पुणे, दि. 11 :- मार्गदर्शन कार्यक्रमाच्या आयोजनाने महिला व बाल विकास विभागाच्यावतीने जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी साजरा करण्यात आला. चर्च रोड, पुणे येथील महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यालयाचे उद्घाटन कोव्हिडमुळे पती गमावल्याने एकल झालेल्या महिलांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास महिला व बाल विकास विभागाचे उप आयुक्त बी. एल. मुंढे, डी. व्ही. हिवराळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता मार्गदर्शन विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती कविता जावळे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी श्रीमती वंदना कवटे आदी उपस्थित होते.
उप आयुक्त श्री. मुंढे यांनी, महिलांनी पुरोगामीपणा सोडून स्वतःमध्ये कालानुरूप बदल करणे गरजेचे असे मत व्यक्त केले. श्रीमती प्रिती करमरकर यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचे होणारे लैंगिक छळ व स्त्रियांचे आजच्या काळातले मानसिक ताण व व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. श्रीमती जावळे यांनी कौशल्य विकास या विष मार्गदर्शन केले. श्रीमती कवटे यांनी रोजगार निर्मीतीवर मार्गदर्शन केले तसेच श्रीमती अश्विनी कांबळे यांनी महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. श्री सौरभ निर्मल यांनी स्त्रियांनी कशा प्रकारे स्वसंरक्षण कसे करायचे याबाबत मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रशात शिर्के यांनी केले. कार्यक्रमास महिला व बालविकास आयुक्तालयाच्या सहायक आयुक्त श्रीमती मनिषा बिरारीस, श्रीमती ममता शिंदे, श्रीमती सुचिता साखोरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती मोनिका रंधवे, श्रीमती सुहिता ओव्हाळ, श्रीमती उज्वला जाधव तसेच विभागातील महिला अधिकारी कर्मचारी उपस्थित होता.