दै चालु वार्ता प्रतिनिधि
औरंगाबाद मोहन आखाडे
औरंगाबाद : कर्णपुरा येथील देवीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून पळून जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना आज सकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.
मुकुंदवाडी भागातील एक महिला कुटुंबियांसोबत आज पहाटे दर्शनासाठी मंदिरात जात होती. कर्णपुरा परिसरात काही अंतरावर पुढे जाताच भाविकांची गर्दी झाली. याच गर्दीचा फायदा घेत एक १५ वर्षीय मुलीने संबंधित महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकाविले. हे कळताच महिलेने आरडाओरड केली. बंदोबस्तात तैनात असलेल्या विशेष पथकाच्या पोलीसांनी मुलीचा पाठलाग करीत ताब्यात घेतले आणि चोरी केलेले मंगळसुत्र पोलीसांनी जप्त केले.
सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक वायाळ, आयुब पठाण, नागरगोजे,चव्हाण, रेड्डी, श्रीकांत सपकाळ, जमीर तडवी, गणेश वाघ, अविनाश दाभाडे यांच्या विशेष पथकाने केली.