
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत सन २०२१-२२ वर्षासाठी महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती,प्रवर्गासाठी नुतनीकरणाचे अर्ज व नवीन अर्ज भरण्यासाठी दिनांक १५ मार्च २०२२ पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे.सर्व संस्था व सर्व महाविद्यालय,प्राचार्यांना सूचित करण्यात येते की,नुतनीकरणाचे अर्ज विहित मुदतीत भरण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावे.नुतनीकरणाचे अर्ज तसेच विद्यार्थ्यांच्या सेंड बँक केलेल्या अर्जांची संबधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्याकडून त्वरित त्रुटीपूर्तता करुन जिल्हा लॉगिनवर पाठविण्यात यावे.विहित वेळेत अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबधित महाविद्यालयांची राहील.
महाडीबीटी संकेतस्थळावर जिल्हयातील विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयांना नुतनीकरणाचे अर्ज रिअप्लाय करण्यासाठी आणि सेंड बँक केलेल्या अर्जांची त्रुटी पूर्तता करण्याचे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त श्रीमती माया केदार यांनी केले आहे.