
दैनिक चालु वार्ता
प्रमोद खिरटकर
चंद्रपूर प्रतिनिधी
चंद्रपूर :- कोरपना तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नांदा येथे नुकतेच भव्य बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी विविध साहित्य तयार करून प्रदर्शनी मांडली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी सरपंच श्यामसुंदर राऊत उद्घाटक जि प सदस्य शिवचंद्र काळे प्रमुख अतिथी म्हणून माजी सभापती संजय मुसळे माजी उपसरपंच पुरुषोत्तम आसवले लहू गोंडे पोलिस पाटील वैशाली भोयर माजी ग्रामपंचायत सदस्य ठणू पाचभाई चंदू राउत अनील येरमे अभय मुनोत रत्नाकर चटप शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तोहित शेख संजय नीत जगन्नाथ गारघाटे ज्ञानेश्वर गिलबिले शाळेचे मुख्याध्यापक मेंदुले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
विद्यार्थिनी ठेवलेल्या विविध साहित्यकृतींचे अतिथींनी पाहणी केली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली स्पर्धेचे परीक्षण प्रमोद वाघाडे राम रोगे यांनी केले संचालान गोविंद गुप्ता यांनी केले तर आभार रोठोड यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षिका भंडारवार तूम्मे बोबडे गज्जलवा र आदींनी परिश्रम घेतलेयावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.