दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
बीड- कोरोना महामारीने जगभरासह भारतातही तांडव घातले होते. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. •आठवडाभरापासून सुरू असलेल्या कवच कुंडल मोहिमेचा समारोप होत असला तरी लसीकरण सुरूच राहणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी सांगितले. तर सर्व नागरीकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन मुफ्ती अब्दुल्ला साहब यांनी केले.
बीड शहरातील मोमीनपुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज कवच कुंडल मोहिमेचा समारोप जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती खुर्शीद आलम तर विशेष उपस्थिती म्हणुन मुफ्ती अब्दुल्ला साहब कुरेशी, हाजी नजीर साहब, जलील हमीद साहब, डॉ. हाश्मी, डॉ. ईसहाक, मुख्याध्यापक मुसा खान, जमीर भाई, हकीम मनीयार, रफत इनामदार, रौफ भाई, राजु भाई, शहेबाज भाई, रजी भाई, जवडकर, सय्यद, मोहम्मद रेहान यांच्यासह या भागातील महिला व पुरुषांची उपस्थिती होते