
दैनिक चालु वार्ता
मुखेड तालुक्यात गाव तिथे युवक काँग्रेसची शाखा उभारू – बोनलेवाड
मुखेड ता.प्रतिनिधी
मुखेड :- सद्याला मुखेड तालुक्यात जि.प.आणि पं.स. निवडणूक तोंडावर आल्याने विविध पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून यात सध्याला काँग्रेस आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे. नुकतच युवक काँग्रेस मुखेड विधानसभा अध्यक्षपदी संतोष बोंडलेवाड यांची निवड झाल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. गाव तिथे शाखा घर तिथे कार्यकर्ता करुन तालुक्यात युवक काँग्रेस मजबुत करणार असल्याचे नवनिर्वाचित युवक कॉंग्रेस विधासभा अध्यक्ष संतोष बोनलेवाड यांनी ओम साई हॉटेल येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले.
माजी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री अशोकाव चव्हाण , माजी आमदार हाणमंतराव पाटील बेटमोगरेकर , माजी जि. प. अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर , कॉंग्रेस तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मंडलापुर यांच्या नेतृत्वात तालुक्यात काँग्रेसची ताकद वाढवुन येणाऱ्या मुखेड – कंधार विधानसभा मतदार संघावर काँग्रेसचा झेंडा फडकवणार असल्याचेही यावेळी बोनलेवाड सांगितले आहे . या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेश सचिव डॉ . श्रावण रॅपनवाड , कॉंग्रेस प्रवक्ते दिलीप कोडगीरे , तालुका उपाध्यक्ष उत्तमअण्णा चौधरी , हेमंत घाटे यांची प्रमुख उपस्थिती होती .
आगामी जिल्हा परिषद निवडणूका व नगर पालिका निवडणूकीतही काँग्रेसचा झेंडा फडकवून पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे हात मजबुत करणार असुन पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या विश्वासाला तडा न जाऊ देता सर्वांच्या सहकार्याने आगामी काळात जनतेपर्यंत पोहचून घराघरात काँग्रेस वाढविणार असल्याचेही यावेळी बोनलेवाड म्हणाले . संतोष बोनलेवाड यांच्या भगिनी हया येवती जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्या असुन बोनलेवाड यांना तालुक्यात माणनारा मोठा युवा वर्ग आहे . नांदेड येथे विद्यार्थ्यासाठी वसतीगृह सुध्दा बोनलेवाड चालवितात .
तर माजी आ. हाणमंतराव पाटील बेटमोगरेकर , माजी जि. पं. अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांचे ते विश्वासू मानले जातात . यांची मुखेड विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण दिसून येते आहे. याचाच फायदा येणाऱ्या जि. परिषद पंचायत समिती निवडणूक जिंकण्यास होईल असा विश्वास सामान्य जनतेतून व्यक्त केला जात आहे.