
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
जनादेश ..
जनता जनार्दन असे
आदेश करावा मान्य
हाती मतदान त्यांच्या
ब्रह्मास्त्र रेअसामान्य
खुल्या दिलाने घ्यावा
पराजय पण समान्य
करू शकतो शंभरही
हातात आपल्या शून्य
मोकळ्यामनाने स्तुती
जिंकता स्पर्धक अन्य
माणूस आहो आपण
नाहीत जनावर वन्य
हार घ्यावी रे समजून
कशाला व्हावे खिन्न
सगळे दिस न सारखे
आपदा विपदा भिन्न
नांगरा पुन्हा जमिनी
लावावे सकस धान्य
येणार पीके मोत्याची
परतूनि जाणारं दैन्य
हाडा मासाची माणसे
आपण सर्व सामान्य
पायावर जर भक्कम
मिळे जय असामान्य
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..
www.kavyakusum.com
2) जय ..
जिंकता कुणी अन्य
मनातून करा स्तुती
नाजूक क्षणीचं खरी
जपायची नीट नाती
चुकले आपले काय
करून घ्यावी ज्ञाती
कळता सुयोग्यवाट
होईलं नव अनुभूती
शेवट असावा गोड
विसर कटूता स्मृती
वैरभाव ते कशाला
वाढवत रहा प्रिती
लागा पुन्हा सेवेला
करावी कर्तव्य पुर्ती
विसरु सारी कटुता
अंगी आगळीस्फुर्ती
पराभवां पचवायला
लागते निधडी छाती
हार झेलतो त्यावर
वाढे आपले ख्याती
जनताजनार्दन आहे
जाणावे सत्य चित्ती
खुर्चीत बसवा उठवा
सगळे त्याचेचं हाती
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..
www.kavyakusum.com
हेमंत मुसरीफ
उप महाप्रबंधक बॅंक ऑफ महाराष्ट्र पुणे भारत पुणे