दैनिक चालु वार्ता
पारनेर प्रतिनिधी
विजय उंडे
पिंपरी जलसेन :- शनिवार दि. १२ मार्च २०२२ पिंपरी जलसेन तालुका पारनेर येथे पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल कुमारी प्रेरणा राजेंद्र काळे यांचा नागरी सत्कार आयोजित केला होता.या समारंभ प्रसंगी जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती माननीय काशिनाथ दाते सर,माजी उपसंचालक तथा कुलगुरू डॉक्टर एस एन पठाण साहेब, पंचायत समिती सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे,माजी शिक्षणाधिकारी भाऊसाहेब थोरात यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बोलताना सभापती दाते सर म्हणाले,”या गावचे भूषण कै. गुलाबराव शेळके साहेब यांनी सहकारात खूप मोठे आदर्श निर्माण केले डॉक्टर एस एन पठाण साहेब, माजी शिक्षणाधिकारी भाऊसाहेब थोरात, वाढवणे साहेब यासारख्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांच्या श्रेत्रामध्ये नावलौकिक मिळवून आले आहे आणि या गावात सर्वांची प्रेरणा घेऊन ज्याच्या नावात प्रेरणा आहे तिने अतिशय कठीण परिस्थितीमध्ये हे यश संपादन केले.
खरे म्हणजे कठीण परिस्थितीत रडत राहण्यापेक्षा लढत राहणे जर अंगीकारले तर यश आपोआप चालत येत असतं. हेच काम आज प्रेरणाने केले म्हणून आपणा सर्वांना तिचा अभिमान आहे.गरीब शेतकरी कुटुंबातून आलेली मुलगी जिने शेतात उभ्या केलेल्या माचीवर आपली अभ्यासिका मानून अभ्यास केला.तलाठ्याची नोकरी मिळाली असतानाही तिने प्रयत्न सोडला नाही.अभ्यास चालू ठेवला आणि हे यश मिळवले.कै. गुलाबराव शेळके साहेबांनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशात नावलौकिक मिळवला.त्यांनी महानगर बँकेची स्थापना केली आणि नावारूपाला आणली.ह्या बँकचे उदयराव शेळके यांनी अतिशय चांगले तत्परतेने काम पाहत आहेत.डॉक्टर पठाण सरांनी नगर जिल्ह्याचे पहिले कुलगुरू होण्याचा मान मिळवला.
त्यांनी पदाच्या माध्यमातून उज्ज्वल ठसा निर्माण केला आणि या परिसराचे नाव मोठे केले.या सर्वांची प्रेरणा घेऊन ही प्रेरणा आज यशस्वी झाली.उंच झाडाला जास्त वारा लागतो तसे आपल्या नोकरीच्या काळात काही अपकीर्ती होईल असे काम करू नये.कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता ही नोकरी कठीण आहे परंतु सर्वसामान्य जनतेच्या निगडित असणारी आहे त्यांची सेवा करणारी आहे.”असेही सभापती दाते यांनी सांगितले आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने प्रेरणास खुप खुप शुभेच्छा! यावेळी इयत्ता पाचवी मध्ये १६ विद्यार्थ्यांचा जिल्ह्यात गुणवंत यादीमध्ये नंबर आल्याबद्दल तसेच महाराष्ट्र राज्य कृषी विभागात प्राविण्य मिळवल्याबद्दल प्रथमेश थोरात आणि १६ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना अतिशय भावुक होऊन पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या कुमारी प्रेरणा काळे हिने म्हटले की,”माझ्या यशाच्या मागोवा घेताना आजचा हा दिवस खुप मोठा आहे का ? कि गावाने माझा सन्मान करावा? हे शोधताना मी भूतकाळात गेले असता २०१७ पासून या प्रवासाची सुरुवात झाली.मी इंजिनिअरिंग केले होते परंतु माझा निश्चय होता.मला अधिकारी व्हायचे मधला काळ माझ्यासाठी खूप अडचणीचा होता.मागील वेळी माझी संधी फक्त एका गुणाने गेली होती तरी पण मी जिद्द सोडली नाही.मी तलाठ्याची परीक्षा दिली आणि मला नोकरीही मिळाली होती. परंतु मला अधिकारी व्हायचे होते. मी करून दाखवेल असा माझ्या पालकांना विश्वास होता.राज्यात महिलांमध्ये फिजिकल मध्ये माझा पन्नासावा नंबर आला.
पाच वर्षाच्या कालावधीत खूप अडचणी आल्या ऐकायला तसेच चांगले आहे परंतु प्रवास खूप खडतर आहे.आपल्या आई-वडिलांना आदर्श मानून यश मिळवता येते आपल्यावरचा विश्वास कायम ठेवून प्रयत्न करा यश नक्की मिळेल. यावेळी सरपंच सुरेश काळे, उपसरपंच भाऊसाहेब पानमंद, शिक्षक नेते राया औटी, माजी सरपंच भाऊसाहेब गाडेकर, संतोष थोरात, मीनाक्षी थोरात, संदीप काळे, बाबाजी वाळुंज, दगडू बोरुडे ,अश्फाक शेख, परशुराम काळे, विवेक थोरात, दत्तात्रय थोरात,फक्कड शेळके, दीपक बोरुडे, बबन घेमुड, दगडू थोरात, मुकिंदा काळे ,सखाराम थोरात, विलास घेमुड, गुलाब थोरात, विठ्ठल आडसरे ,अंबादास काळे, देवराम घेमूड, रंगनाथ वाढवणे, गणेश वाढवणे, गणेश पुणेकर, ऋषिकेश काळे, तुषार काळे, प्रतीक थोरात, किरण वाढवणे ,प्रवीण घेमूड, शैलाताई काळे ,राजू काळे, सागर बोरुडे, हिरामण थोरात, प्रदीप आडसरे, सोमनाथ आडसरे, पोपट थोरात, राजन शेख, दादाभाऊ बोरुडे सर, रामदास बोरुडे, निवृत्ती थोरात, शेख मॅडम, छाया काळे, सिंधू काळे, संगीता थोरात , ग्रा.स. अश्विनी भिंगारदिवे, पिरताजी कदम, पोपट वाढवणे, ठुबे सर, शंकर बोरुडे, पंढरीनाथ थोरात, मारुती थोरात ,धनंजय थोरात, सचिन वाढवणे ,शिवाजी थोरात इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पठारे सर यांनी केले तर आभार सरपंच सुरेश काळे यांनी मानले.