
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
पुणे :- नाशिकमध्ये एका शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची घटना ताजी असताना, तसेच राज्यातील अनेक भागात शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण केल्याच्या घटना वारंवार घडत असताना, आता पुण्यात महिला बाऊन्सरकडून शाळेतच पालकांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फी बाबत विचारणा केली असता पालकांना मारहाण करण्यात आली आहे. पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील “क्लाईन मेमोरियल शाळेत” ही घटना घडली. पालक मंगेश गायकवाड यांच्याकडून या प्रकरणी शाळेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून अदखलपात्र गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.
मात्र पालकांच्या आरोपांवर अद्याप क्लाईन मेमोरियल शाळेकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तसेच शाळेच्या या गंभीर घटनेमुळं आश्चर्य व्यक्त केलं जात असून पालक वर्गातून संतापाची भावना आहे. दरम्यान, फिबाबात निवेदन घेऊन आलेल्या पालकांना मारहाण करत बाचाबाची झाली आहे. मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी मुख्याध्यापकांकडून आलेल्या पत्राबाबत म्हणणं मांडण्यासाठी सगळे पालक शाळेत गेले होते. तसेच आम्ही निवेदन घेऊन आलो आहोत, असं पालकांकडून सांगण्यात आले. त्यावेळी मुख्याध्यापकांना भेटण्याची मागणी करणाऱ्या पालकांना महिला बाऊन्सरनं मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
तसेच मारहाणीचा व्हीडिओ समोर आला आहे, या व्हीडिओत महिला बाऊन्सर पालकांना मारहाण करत असल्याचं दिसत आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ व्हायरल होत आहे, तसेच मारहण केल्याचे स्पष्ट व्हीडिओत दिसत आहे, त्यमुळं सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शाळेच्या आवारातच जर आपलं म्हणणं मांडण्यासाठी गेलेल्या पालकांना अशाप्रकारे मारहाण होत असेल, तर हे खूपच धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया सर्वच स्तरातून व्यक्त केली जात आहे. त्यामुळं अशा शाळेत आम्ही मुलांका का म्हणून पाठवायचे असा सवला पालक वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे.