
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रा.यानभुरे
जयवंत सोपानराव
नांदेड :- कंधार तालुक्यातील मौजे बहादरपुरा येथील रहिवासी असलेले तथा उल्हास मेमोरियल ट्रस्त कंधारचे अध्यक्ष व श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार चे सदस्य माननीय भाई दत्तात्रय गुरुनाथराव कुरुडे यांना दारिद्र्य निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय राजश्री शाहू महाराज समाज रत्न गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री शिवाजी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माणिक नगर व नवीन कौठा नांदेड च्या वतीने हृदय पूर्ण सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी भाई दत्तात्रय गुरुनाथराव कुरडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
भाई दत्तात्रय गुरुनाथ राव कुरुडे श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार चे संस्था सचिव तथा ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी , माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे यांचे चिरंजीव असून असून त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे कंधार परिसरातील तमाम जनतेकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. या सत्कार सोहळा समारंभाचे अध्यक्ष मधुकरराव कुरुडे ( शालेय समिती सदस्य , श्री शिवाजी हायस्कूल नांदेड ) यांनी भुषविले होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहणे शालेय समिती सदस्य मा.सुर्यकांत रुक्माजी कावळे , विजयाताई कुरुडे , संजिवनी ताई कुरुडे , श्री निरपणे सर , उपमुख्याध्यापक कदम सर इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या -हदयपूर्ण सत्कार सोहळ्याचे आयोजन व नियोजन श्री शिवाजी प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माणिक नगर व नविन कौठा नांदेड च्या वतीने करण्यात आले होते याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक सुधीर भाऊ गुरुनाथराव कुरुडे व उपप्राचार्य परशुराम येसलवाड यानी सत्कार सोहळ्यानिमित्ताने मनोगत व्यक्त करुन भाई दत्तात्रय कुरुडे याना -हदयपुर्ण शुभेच्छा दिल्या तसेच इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा देऊन भावी आयुष्य निरोगी व सुख समृद्धी चे जावो अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या
याप्रसंगी श्री शिवाजी महाराज प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्यात हायस्कूलचे पर्यवेक्षक सदानंद नळगे , शिवराज पवळे तसेच ज्युनिअर कॉलेज चे पर्यवेक्षक माधव ब्याळे , परीक्षा विभाग प्रमुख व मुरलीधर घोरबांड , सांस्कृतिक विभागप्रमुख स्वाती कान्हेगावकर , प्रा.वसंतराव रठोड , प्रा.सय्यद जमिल , प्रा यानभुरे जयवंत , प्रा.अमर दहीवडे , प्रा.श्रीवास्तव दिपक , प्रा.कैलास पतंगे , प्रा.देशमुख शिवशंकर , प्रा. सोनटक्के शिवानंद , प्रा. शेख उमर , प्रा.मोरेश्वर निलेश , प्रा.कपील सोनकांबळे ,्रा मोरे गोविंद , प्रा.रुपाली कळसकर ,प्रा.स्वामी संगिता ,प्रा जाधव प्रतिभा , प्रा.जामकर दिपाली , प्रा.नवघरे रत्नमाला , प्रा.शेख रेश्मा , प्रा.दुल्हेवाड वैशाली ,प्रा. पारेकर शिल्पा ,प्रा.कोंढेकर तेजस्विनी , प्रा.गायकवाड संतोष , प्रा.विक्रम लुंगारे श्री प्रशांत कुरुडे ,बालाजी निरपणे ,समर्थ लोखंडे ,इत्यादी सह प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम् या गीताने झाली व समारोप राष्ट्रगीताने झाला.