
दैनिक चालु वार्ता
अतनूर प्रतिनिधी
अतनूर :- येथून जवळच असलेल्या गव्हाण ता. जळकोट येथील भीमाशंकर रामचंद्रराव तोडकर यांची बँक ऑफ इंडिया ने डिसेंबर २०२१ मध्ये घेतलेल्या अंतर्गत पदोन्नती परीक्षेत उत्तीर्ण होऊन सहाय्यक प्रबंधक या पदावर पदोन्नती झाली. यांच्यासह उदगीर शाखेमधील तीन कर्मचाऱ्यांची क्लार्क पदावरून सहाय्यक शाखा प्रबंधक पदावर पदोन्नती झाली. याबद्दल त्यांचा महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेस शाखा अतनूर, लातूर जिल्हा युवक कुणबी मराठा मंडळ उदगीर-उदगीर-अतनूर यांच्या वतीने दि.११ मार्च रोजी वार शुक्रवारी अतनूर येथील कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी बँक ऑफ इंडियाचे शाखा प्रबंधक गणेश पांडुरंग तेलगावे यांचा पण उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तछाया इंडस्ट्रीजचे उद्योजक दत्तात्रय सावरे-पाटील हे होते. यावेळी हेड कॅशियर भीमाशंकर रामचंद्र तोडकर गव्हाणकर, क्लार्क जेसी जॉन्सन जगदाळे, क्लार्क सुमित चलगंजे, यांना क्लार्क पदावरून सहाय्यक शाखा प्रबंधक पदावर पदोन्नती झाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय शिंदे अतनूरकर, लातूर जिल्हा युवक कुणबी मराठा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष बी.जी.शिंदे अतनूरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास शाखा प्रबंधक गणेश पांडुरंग तेलगावे, फिल्ड ऑफिसर रवी पांढरे, ऑफिसर अनुराग तोटावर, सेवक विशाल नाईक, सेवक शेखर आठाणे, बँक मित्र अमर देवकते उपस्थित होते.