
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी
देगलूर :- सध्या महाराष्ट्र मध्ये एसटी महामंडळ कर्मचारीच्या वतीने महाराष्ट्र भर संप पुकारला असुन काही ठिकाणी तुरळक प्रमाणात एसटी चालू असुन आता तोंडा वर आलेल्या दहावीच्या बोर्डाच्या परिक्षा असुन त्यांना तात्पुरते स्वरूपात 15 मार्च पासून पेपर संपेपर्यंत तरी ग्रामीण भागातील एसटी सेवा पुर्ण पणे चालू करून विध्यार्थ्यांची हेळसांड थांबवावे या मागणीचे धनाजी मनोहरराव जोशी यांनी आज निवेदनाद्वारे देगलूर आगार प्रमुख यांना विनंती केली.