
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी कवी
सरकार इंगळी
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर व देवराष्ट्रै ग्रामपंचायत आयोजित ३२वे साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले.शेवटच्या सत्रात प्रसिद्द साहित्यक, कथाकथनकार लेखक प्रा,शांतीनाथ मांगले बलवडी यांनी आपल्या भाषणात,साहित्य चळवळीस चालना मिळण्याकरिता साहित्यिक मंडळींचं योगदान असायला हवं असे सांगून समाजिक,शिक्षण,सहकार विषयी लेखकांनी लिहले पाहिजे,कथाकथनातून निव्वळ मनोरंजन न करता त्यातून बोध घ्यायला हवा असा सल्ला दिला.
ग्रामीण भागातील लोकांच्या चालण्या बोलण्यातून कशी विनोद निर्मीती होते.हे पटवून सांगितले.घरातल्या घरात सुध्दा विनोद निर्माण होतात हे आपल्या खास विनोदी शैलितून सांगण्याचा प्रर्यंत्न केले. ग्रामीण ढंगातील कथा कथन करून खेड्यापाड्यांततील गाय,म्हैश, रेडकू,कुत्री,मांजरं यांचे हुबेहूब आवाज काढून व लहान मुलांचे हावभाव करून रसिकांची मने जिंकून संमेलनात हास्या पिकवला. आभार मा .पत्रकार दत्तात्रय सपकाळ यांनी मानले.