
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
औरंगाबाद :- कामाच्या व्यापामुळे वेळ वाचवण्यासाठी अनेकांना भरभर खाण्याची सवय असते. मात्र, घाईघाईत जेवण केल्याने तुमचा वेळ वाचत असला, तरी अन्न नीट चावले जात नाही. वेगात जेवण केल्यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतो. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..!
–पूर्ण पोषण होत नाही – घाईघाईत जेवण केल्याने आपण किती प्रमाणात खातोय, याची आपल्याला कल्पना नसते. त्यामुळे बऱ्याचदा शरीराचे पूर्ण पोषणही होत नाही..
विचार क्षमतेवर परिणाम – भरभर जेवण केल्याने पोट भरले की नाही, याबाबत मेंदूला संदेश मिळत नाही. त्याचा तुमच्या विचार क्षमतेवरही परिणाम होतो.
जलद वजन वाढते – घाईघाईत अन्न खाल्ल्याने जास्त जेवण होते. त्यातून वजन वाढण्याचा धोका असतो. अन्न योग्य प्रकारे न चावल्याने शरीराला पोषक तत्त्वे मिळत नाहीत. त्यातून लठ्ठपणा वाढतो.
पचनसंस्थेवर परिणाम – पटकन जेवणामुळे अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही. त्याचा पचनसंस्थेवर मोठा परिणाम होतो.
मधुमेहाचा धोका – अन्न नीट न चावल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे मधुमेहाची समस्या उद्भवू शकते.