दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- Home नांदेडसगरोळी घाटावर पावत्याविनाच वाळूची वाहतूक नांदेड सगरोळी घाटावर पावत्याविनाच वाळूची वाहतूक एकमत ऑनलाईन March 14, 2022 20 बिलोली : प्रतिनिधी
तालुक्यातील सगरोळी वाळु घाटावर बनावट पावत्याचा वापर होत असल्याची बाब पुढे आली असून रात्रंदिवस शेकडो वाहणांच्या माध्यमातून वाळुची वाहतुक होत असल्याने घाटाची चाळणी होत आहे. या ठेक्यासाठी जिल्हास्तरावरुनच राजकीय दबाव या अधिका-यांवर असल्याचेही बोलल्या जात आहे.
बिलोली तालुक्यातील मांजरा नदितील वाळु घाट हा सोन्याची अंडी देणाराच ठरत आहे. हे अनेकांना वरदान ठरत आहे . येथे कोणीही या आणि करोडपती बना अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सगरोळी वाळु घाट हा अयुब मचकुरी या ईसमास गट क्र.३५८ मधुन ३७१० ब्रास वाळु सप्टेंबर अखेरपर्यंत उचलण्याची परवानगी मिळाली आहे. या ठेकेदारावर यापुर्वीच गेल्या चार वर्षाखाली ठपका ठेवण्यात आला होता. घाट बंद करण्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिका-याने दिले होते. ती कारवाई बाजुला ठेवुन एका मंत्र्याच्या मर्जीने या वादग्रस्त ठेकेदाराला हाच घाट पुन्हा बहाल करण्यात आला.
हा ठेकेदार मुखेड तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या एका बड्या नेत्याचा खास समर्थक असल्याचे माहीती समोर येत आहे. सगरोळी वाळुघाटावरून गेल्या सव्वा महीण्यापासुन चार ते पाच जेसिबीद्वारे उत्खनन चालु आहे. यात सर्व बनावट पावत्याचा वापर होत आहे. पण येथील एकाही अधिका-यांत गाडी पकडण्याची हिम्मत नाही, घाटात दहा ते पंधरा फुटापर्यंत खड्डे खोदल्या जात आहे. घाटात एकही सिसिटीव्ही कॅमेरा नाही, ३७१० ब्रास हे केवळ चार दिवसातच पुर्ण झाल्याचा अंदाज आहे मग भुमी अभिलेख कार्यालयाने वाळुची मोजमाप करुन अजुन शिल्लक कसे काय दाखलत आहे .
हा न सुटनारा प्रश्न आहे. घाटात दोनशेच्यावर ट्रक्टर चालतात हे कोणत्या क्षेत्रातुन भरल्या जात आहे. ह्यात ही ठेकेदाराची मोठी चालबाजी आहे. एकंदरीत गट, क्षेत्र सोडुन सगरोळीच्या संपुर्ण घाटावर ठेकेदाराने ताबा मिळविला आहे. दुसरीकडे जिल्हास्तरावरुन काहीतरी कारवाई होईल, या अपेक्षेने पर्यावरण प्रेमीची नजर लागली होती.