
दैनिक चालु वार्ता
मुखेड प्रतिनिधी
संघरक्षीत गायकवाड
मुखेड :- मुखेड येथील परिचय मेळाव्यास उत्तम प्रतीसाद मिळाला असुन महाराष्ट्र , आंध्र , कर्नाटक ईत्यादी ठीकाणावरुन समाजबांधवांची उपस्थिती होती. मेळाव्याचे अध्यक्ष दत्तात्रय शंकरराव चौधरी , स्वागत अध्यक्ष दिलीप कोडगीरे , संयोजक बालाजी पारसेवार हे होते मेळाव्यात उपवधु साठी नोंदणी शुल्क नव्हते. मेळावा यशस्वी करण्यासाठी मुखेड मधील सर्वच आर्य वैश्य बांधव यांनी हीरेरीने काम केले व मेळावा यशस्वी रीत्या पार पडला.
मेळाव्यासाठी मुख्य मार्गदर्शक बाॅडी मध्ये आर्य-वैश्य-महासभेचे राज्य उपाध्यक्ष नंदकुमार मडगुलवार , वासवी क्लबचे माजी डेप्युटी गव्हर्नर उत्तमअण्णा चौधरी , आर्य-वैश्य-महासभेचे नांदेड उपाध्यक्ष राम सावकार पत्तेवार, दिपक मुक्कावार वासवी क्लबचे माजी उपाध्यक्ष यांनी पण मेळावा उत्तम रीत्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. मेळाव्यास भेट देण्यासाठी बीलोलीहुन आर्य-वैश्य-महासभेचे नांदेड जील्हाध्यक्ष विजय कुंचनवार , नांदेड हुन आर्य-वैश्य-महासभेचे प्रणव मनुरवार , व्यवहारे आले होते.
त्यांचा सत्कार मुखेड च्या वतीने नंदकुमार मडगुलवार , उत्तमअण्णा चौधरी , राम पत्तेवार यांनी केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उदघाटक भारत रामीनवार , माजी नगराध्यक्ष बाबुरावजी देबडवार , उल्हास देबडवार , डाॕ. डुबे साहेब ह्यांचा पण सत्कार संयोजन समीती तर्फ करण्यात आला.