
दैनिक चालु वार्ता
नांदुरा प्रतिनिधी
किशोर वाकोडे
मलकापूर :- दि.१४. माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन (मलकापुर) महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित जनता कला वाणिज्य महाविद्यालय मलकापूर( जिल्हा बुलढाणा) यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष संस्कार शिबिर मंदिर एक दिवसीय प्राथमिक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.सदर शिबिरामध्ये ग्राम गिरणी येथील ग्रामस्थांनी तसेच जनता कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन च्या वतीने घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये डॉ. स्वप्नील चोपडे मलकापूर यांच्या तज्ञ कीं मार्फत रुग्णांची तपासणी करण्यात आली.
यावेळी माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष विवेक राजापुरे, सचिव शुभम सोनवणे, जनता कला महाविद्यालयाच्या वतीने प्रा. तुकाराम मोरे, प्रा. डॉ. सौ.व्ही.एच. काटे, प्रा. सौ. ज्योती इंगळे इच्छा आदींची उपस्थिती होती. सदर शिबिराकरिता माणुसकी फाउंडेशन च्या वतीने कोषाध्यक्ष मंगेश देशपांडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख केशव किंनोळकर, सोशल मीडिया प्रमुख सागर सुग्रम कर, सदस्य विवेक सोनवणे, यश दिक्षित इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.