
दैनिक चालु वार्ता
नांदुरा प्रतिनिधी
किशोर वाकोडे
शेंबा बु.(नांदुरा) दि.१२ :- वाढदिवस म्हटले की केक, पार्टी, फिरायला जाणे, मजा करणे हे आजच्या तरुणाईचे समीकरण बनले आहे. या सर्व गोष्टी बाजूला सारून शेंबा बु. येथील वंचित बहुजन आघाडी शाखाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य प्रवीण भिडे यांनी प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र शेंबा येथे कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया शिबिरात सहभागी असलेल्या रुग्णांना फळे वाटप व लहान मुलांना खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा केला. याबाबतीत वंचित बहुजन आघाडी शाखाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य प्रवीण भिडे म्हणाले की, राज्यात दोन वर्षापासून कोरोणा परिस्थिती आहे.
त्यामुळे माझे तरुणाईला आव्हान आहे की, आपणास उद्याचे भविष्य आहात. सामाजिक बांधिलकी व भान जपणे आपल्या हातात आहे. आपल्या वाढदिवसाला निमित्त अनावश्यक खर्च टाळून रुग्णालय, वृद्धाश्रम, अंध, दिव्यांग, शेतकरी,शाळा अशा गरजूंना मदत करा. जेणेकरून आपल्या हातून हे सत्कार्य चांगले झाले, हे मानसिक समाधान लाभेल. प्राथमिक आरोग्य केंद्र शेंबा येथे रुग्णांना फळ वाटप प्रसंगी शेंबा ग्रामपंचायत सरपंच नंदकिशोर खोंधले, तथा सर्व सदस्य कर्मचारी व प्राथमिक आरोग्य केंद्र येथील अधिकारी, नर्स, व कर्मचारी उपस्थित होते.