
दैनिक चालु वार्ता
कोरपना तालूका ग्रामीण प्रतिनिधी
प्रदिप मडावी
कोरपना तालूका :- कोरपना तालुक्यातील वडगाव येथे चंद्रपूर जिल्हाचे 1857 चे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांची जयंती साजरी करण्यात आली. क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला मल्यार्पण करून गोंडीयन समाज बांधवांकडून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच मोहपतराव मडावी, माजी ग्रामपंचायत सदस्य वच्छलाबाई कुळमेथे, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल मडावी, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे कोरपना तालुका प्रसिद्धी संकेत कुळमेथे, विशेषराव शेडमाके, दशरथ कन्नाके, विलास पेंदोर, अरविंद किन्नाके, अस्मिताताई मडावी, संगीता शेडमाके, संगीता मडावी, समीक्षा कुळमेथे, प्रगती कन्नाके तेजस्विनी मडावी आणि वडगाव येथील समाजबांधव तसेच आवाळपूर दूधडेअरी इथे क्रांतिवीर बापूराव शेडमाके यांचि जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी प्रमूख पाहुणे आवाळपूर ग्रामपंचायत सरपंच प्रियांका ताई दिवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व पूजन करण्यात आले ग्रामपंचायत सदस्य शूषमिता पानघाटे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक मारोती पोटामी, शंकर गेडाम, राजकूमार पूरके, पंढरी कोडापे, सतिश आत्राम, अंकीत पूरके , समाज सेवक प्रदिप मडावी , आणि या कार्यक्रमाला महिलांनी सूध्दा खूप छान सहकार्य केले.