
दैनिक चालु वार्ता
मुखेड ता प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
मुखेड :- मुखेड तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसांना नाम फाउंडेशनकडुन प्रत्येकीय २५ हजार रुपयांचा धनादेश* शहरातील विश्रामगृह येथे रविवारी दुपारी ३:०० वाजता वाटप करण्यात आले यावेळी नाम फाऊंडेशनचे जिल्हा संघटक तथा दै. गोदातीर समाचारचे संपादक केशव घोणसे पाटील, पोलिस निरिक्षक विलास गोबाडे, पत्रकार शेखर पाटील, शिवकांत मठपती, संदिप कामशेट्टे, नामदेव यलकटवार, रियाज शेख, किशोर सिंह चौव्हाण, दत्तात्रय कांबळे, हसनोद्दीन शेख, अनिल कांबळे, ज्ञानेश्वर डोईजड, जयभीम सोनकांबळे, शिवराज पाटील, मुस्तफा पिंजारी, सामजिक कार्यकर्ते अदनान पाशा, योगेश मामीलवाड, सय्यद नयुम मुल्ला, सह इत्यादी जन यावेळी उपस्थित होते.
नाम फाऊंडेशन हे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या मराठी सिनेअभिनेत्यांनी सुरू केलेली एक धर्मादाय संस्था आहे. ह्या संस्थेची स्थापना सप्टेंबर २०१५मध्ये झाली. ही संस्था महाराष्ट्रातील दुष्काळी भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करते. १) बाबु शंकर राठोड, यांची वारस मुलगी कोमल बाबुराव राठोड, २) जाहुर येथील सुनिल त्रंबक डोईफोडे यांची वारस पत्नी ज्योती सुनिल डोईफोडे, ३) तग्याळ येथील व्यंकट गणपतराव गोपनर वारस पत्नी विठ्ठाबाई व्यंकटी गोपनर, ४) सावरगाव वाडी येथील भारत पंढरी गुट्टे यांची वारस पत्नी विठाबाई भारत गुट्टे ५) लादगा येथील नारायण हणमंत मळगे, व ६) वर्ताळा तांडा येथील नितिन राजाराम पवार वारस पत्नी अश्विनी राजाराम पवार या कुटुंबाच्या वारसांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची रक्कम आर्थिक मदत म्हणून सुपूर्द करण्यात आले आहे.