
दैनिक चालु वार्ता
वानोळा प्रतिनिधी
अजय चव्हाण
वानोळा :- वानोळा दलीत वस्तीतील सुमारे 2.5 लाख रुपये खर्चून दलीत वस्तीतील स्ट्रीट लाईट बसविण्यात आली होती, व देखभाल दुरुस्तीची कामे नांदेड येथील एका कंत्राट दाराकडे देण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी ही स्ट्रीट लाईट काढून टाकण्यात आली व लाईट चे धूळखात पडले होते. या विषयी दैनिक चालू वार्ता ने वृत प्रकाशित करताच अवघ्या 15 दिवसाच्या आत स्ट्रीट लाईट पुन्हा बसविण्यात आले. यावेळी दलीत आदिवासी समाज बांधवांनी आनंद व्यक्त करीत दैनिक चालू वार्ता चे आभार मानले.