
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- नागरिकांच्या सुरक्षा आणि त्यांच्या जीव व संपत्तीचे नुकसान होऊ नये म्हणून पोलीस नेहमीच सतर्क असतात. सतर्कतेल्या तत्परता मिळावी म्हणून डायल ११२ सेवा सुरू करण्यात आली.मात्र, धारणी तालुक्यातील शिरपूर येथील काही समाजकंटकांनी या सेवेची खिल्ली उडवीत शुक्रवारी ११२ वर बलात्कार संदर्भात ‘फेक कॉल’ आला. त्यामुळे शिरपूर येथे मदतीसाठी पोलीस पोहचले असता,त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली.या घटनेत एक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.
पोलिस कर्मचारी आशिष मेटाकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी बाबूलाल बुड्डा हिलावेकर यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३५३, ३३२, ३३३, १८२, १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी ७.३० वा. नेहमीप्रमाणे डायल ११२ चा वाहन क्रमांक ७३०१ वर पोलीस कर्मचारी आशिष मेटाकर यांचे पथक तैनात होते.सकाळी ८ वा. ग्रामीण कंट्रोल रूम मधून कॉल मिळाला की,शिरपूर येथे एक राजेश नावाचा व्यक्ती घरात घुसून बाबुलाल यांच्या पत्नीवर अतिप्रसंग करीत असल्याची माहिती मिळताच पोलीस सतर्कतेने डायल ११२ वाहनातून रवाना झाले.आशिष,प्रमोद कुमार,प्रेम पटेल,राजेंद्र ठाकरे, एक महिला पोलीस कर्मचारी अंजली हे तत्काळ शिरपूर येथे पोहोचले.
येथे बाबुलालचे घर विचारले.बाबूलाल यांच्या घराजवळ पोहोचल्यावर आरोपी बाबुलाल घरासमोर उभा होता.त्याला पोलीसांनी विचारले असता त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही.पोलीस ज्यावेळी घरात जायला लागले;त्यावेळी बाबुलालने पोलीस कर्मचारी आशिष यांची कॉलर पकडून धक्का दिला आणि दगडाने डोक्यावर मारले.
उर्वरित पोलीस त्याला पकडायला गेले असता, बाबुलाल तेथून फरार झाला.
खरेतर सदर ठिकाणी कुठलीही अतिप्रसंगाची घटना नव्हती. तत्काळ घडलेल्या घटनेची सूचना पोलिस स्टेशनमध्ये परतल्यावर देण्यात आली.आरोपिंविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून,जखमी पोलीस कर्मचारी आशिष मेटाकर यांना रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.ठाणेदार बेलखेडे यांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीबाबत विचारणा केली.
पोलीस कर्मचाऱ्यांची मनोबल तोडणारी तसेच खिल्ली उडवणारी घटना
ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांची संकल्पना,तसेच ए.एस.पी.शशिकांत सातव,एस.डी.पी.गौहर हसन यांचे कुशल मार्गदर्शन व धारणीचे ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे नेहमीच नागरिकांच्या सुरक्षेसाठी समर्पित असलेले दिसून येते.पोलीस कर्मचारी कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळत असतांनाच नेहमी मानवतेला महत्व देतात.पोलीसांनी विशेषतःआदिवासी नागरिकांची सुरक्षा सर्वोतोपरी मानले आहे.
मात्र,आज घडलेली घटना ही पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल तोेडणारी घटना आहे.अशा घटनांमुळे पिडीत लोकांच्या मदतीला धावणाऱ्या पोलीस कर्मचार्यांचे मनोबल तुटते.त्यामुळे खर्या अर्थाने ज्या व्यक्तींना मदतीची आवश्यकता असते,त्यांना अश्या घटनांचा परिणाम भोगावा लागतो.
शिरपुर येथील नागरिक चिडीचूप
डायल ११२ चे वाहन ज्यावेळी शिरपुर येथे पोहोचले.त्यावेळी पोलीसांनी अतिप्रंसगाबाबतची माहिती तेथील नागरिकांना दिली.तसेच आरोपी बाबुलालचे घर विचारले.त्यावेळी तेथे असलेल्या लोकांनी पोलीसांना सत्य परिस्थितीची कल्पना दिली नाही.त्यावेळी तेथील नागरिकांनी चूप न राहाता सत्य परिस्थितीचे कल्पना दिली असती तर पोलीस कर्मचारी जखमी होण्याची घटना घडली नसती.पोलीस हे नागरिकांची मदत आणि सुरक्षा करीत असतात.सदर आरोपींवर कडक कारवाई करून कठोर शिक्षा देण्यात यावी.जेणेकरून डायल ११२ संदर्भात पुन्हा कोणही असा प्रकार करणार नाहीत.