
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पुणे शहर
गुणाजी मोरे
पुणे :- वडगावशेरी येथील नेत्रदीपक सोहळा, अतिशय उत्साहाच्या वातावरणात शिवछत्रपतींचा भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण गेली ३५० वर्षांपासून इथल्या प्रत्येक माणसाला ज्यांनी स्वाभिमानाची प्रेरणा दिली, असे हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा नगरसेवक योगेश मुळीक यांच्या माध्यमातुन वडगावशेरी येथे उभारण्यात आला आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच शिवसृष्टी व १५० फूट उंच राष्ट्रध्वजाचे लोकार्पण प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकातदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांदादा पाटील व भा. ज. पा. पुणे शहर अध्यक्ष मा. जगदीश मुळीक, मा. आमदार बापूसाहेब पठारे, योगेश टिळेकर, नगरसेवक योगेश मुळीक, सिद्धार्थ धेंडे, अनिल टिंगरे, बापूराव कर्णे गुरुजी, नाना संगडे, मुक्ता जगताप, राहुल भंडारे, श्वेता गलांडे, ऐश्वर्या जाधव, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येणपुरे, संदिप लोणकर, संतोष खांदवे, ज्योती जवळकर, शशी बोडके यांच्यासह पदाधिकारी व स्थानिक उपस्थित होते.