
दैनिक चालु वार्ता
गंगापूर प्रतिनिधी
सुनील झिंजुर्डे पाटील
गंगापूर :- गंगापुर तालुक्यातील नांगरे बाभुळगाव येथील शेतकरी मच्छिंद्र अशोक थोरात वय 25 रविवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास गट नंबर 59 मधील शेतात पाणी भरण्यासाठी गेला असता विहिरीवर पंप चालू करण्यासाठी स्टाटर चे बटण दाबण यास गेला असता विजेच्या जोराच्या धक्क्याने जागीच गतप्राण झाला, पुढील उपचारासाठी लासुर स्टेशन येथील खाजगी दवाखान्यात असता डॉक्टरांनी मयत घोषित केले, यामुळे येथीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात शेवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन भाऊ असा परिवार आहे.