
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- अवैध धंद्यांना मदत करुन हपते गोळा करने व आपल्या अधिकाराचा गैरवापर करून गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा आरोप सातारच्या ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचावर सोलापूर बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी केला आहे.
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी हा आरोप केला आहे. राऊत यांच्या आरोपानंतर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
आमदार राऊन यांनी आरोप केली की, तेजस्वी सातपुते गुन्हेगारांच्या विरोधात तक्रार करणाऱ्यांवरच खोटे गुन्हे दाखल करण्याची भीती घालून त्रास देतात. त्यांच्यामुळे सोलापूर ग्रामीणमध्ये अवैध दारू, गुटखा, वाळू तस्करीचे प्रमाण वाढून गुन्हेगारी वाढली आहे. म्हणुन याला जबाबदार असलेल्या सोलापूर पोलीस अधीक्षक सातपुते यांच्यावर कारवाई करावी, असे विधिमंडळ अध्यक्षांच्या पुढे प्रश्न उपस्थित करून लेखी तक्रार केली आहे.
आमदार राऊत यांनी विधीमंडळ अध्यक्षांसमोर प्रश्न उपस्थित करत म्हटले आहे की, सातपुते या अवैध धंद्यांना मदत करून हप्ते गोळा करतात आणि आपल्या अधिकाराचा गैरवापर करून गुन्हेगारांना पाठीशी घालतात. याची लेखी तक्रारही राऊत यांनी केली आहे. सातारा जिह्यात कार्यरत असताना त्यांनी कराडमधील एक सर्वसामान्य व्यक्तिवर सुद्धा खोटा गुन्हा दाखल केला होता. सातारच्या एका प्रसिद्ध व्यापाऱ्याला मोक्का लागला असताना तो मोठी तडजोड करून काढून टाकल्याचा आरोप सुद्धा त्यांच्यावर आहे.
तसेच त्यांच्या विरोधात न्यायालयाबरोबरच महाराष्ट्र राज्य पोलीस प्राधिकरण यांच्या न्यायालयात सुद्धा केसेस सुरू आहेत. तेजस्वी सातपुते या महिला अधिकारी असून सुद्धा असे वाईट काम करत आहेत. त्यामुळे पोलीस खात्याची बदनामी होत आहे हे दुर्दैव आहे. अशा या अधिकाऱ्यांना पोलीस विभागातून काढून त्यांच्या पोलीस विभागातील संपूर्ण कारकिर्दीची चौकशी करून ईडी आणि सीबीआयतर्फे कडक कारवाई करावी अशी सर्वसामान्य जनतेकडून मागणी होत आहे. असे गंभीर आरोप आमदार राऊत यांनी केले आहेत.