
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी कवी सरकार इंगळी
रविवार दिनांक 13मार्च 2022 रोजी विणकर राष्ट्रीय महाअधिवेशन इचलकरंजी येथे मोठ्या दिमाखात पार पडले. मा. छगनराव भुजबळ साहेब, मा.चंद्रकांत पाटील साहेब, मा. खा,कल्लाप्पाण्णा आवाडे साहेब, आमदार. प्रकाश आवाडे साहेब, …इ. राजकीय मान्यवरांच्या उपस्थित विणकरांच्या अनेक समस्या घेऊन अधिवेशन सुरूवात झाली.अधिवेशनत हातमाग,विणकर कामगार यांना विणकर गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
विणकर गौरव पुरस्कारासाठी कवियत्री सौ,आरती लाटणे, यांचे नाव पुकारताच त्यांचे मन भरून आले. हातमागावर रात्रंदिवस धोती विणणारे आजोबा ,वडील आणि मदत करणारी त्यांची आजी एकूणच घर परिवार क्षणभरातच आठवला. अतिशय हालाखीत कष्ट करणारा विणकर बांधव आजही हक्कासाठी लढतो आहे हे सौ,आरती लाटणे, यांनी जवळून पाहिले होते.
पहिल्यांदाच सौ,आरती लाटणे, यांचे,घर परिवार पुरस्कार सोहळ्यामध्ये सामील झाले होते.. त्यांच्या परिचय वाचन सुरू झाले असता त्या भारावून गेल्या. योग गुरु माननीय पट्टाचार्य स्वामी, संस्थापक अध्यक्ष सुरेश भाकरे ,प्रदेशाध्यक्षा साळी मॅडम, जिल्हाध्यक्ष राहुल लाटणे, तालुकाध्यक्ष संगीता खारगे, इ. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला .
सहकुटुंब सहपरिवार सोहळा अविस्मरणीय झाला.असे त्या म्हणाल्या व त्यांनीसंयोजक मंडळाचे मनःपूर्वक आभार मानले.