
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
पणजी :- गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांना हंगामी सभापती म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, खासदार विनय तेंडुलकर उपस्थित होते. नवनिर्वाचित आमदारांना गावकर आमदारकीची शपथ देणार असल्याची माहिती आहे.
विधानसभेचे विशेष अधिवेशन मंगळवारी 15 मार्च रोजी बोलवण्यात आले आहे. या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांना हंगामी सभापती गणेश गावकर आमदारकीची शपथ देतील. सातव्या विधानसभेचे मुदत 16 मार्च रोजी संपत असल्याने त्यापूर्वी नवी विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे असल्याने हा सोपस्कार पार पाडण्यात येत आहे.