
दैनिक चालु वार्ता
नांदुरा प्रतिनिधी
किशोर वाकोडे
नांदुरा दि.१४ :- दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत अंबोडा, शेलगाव मुकुंद, व धानोरा बु येथील कामाचे प्रस्ताव जिल्हा पं. समाज कल्याण विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मंजुरीकरिता सादर करण्यात आलेले आहे. या कामांना तात्काळ मंजूरात देण्यात यावी या मागणीसाठी आज 14 मार्च पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की अंबोडा येथील रस्ता व नालीचे ७ लक्ष रुपयांचे काम, शेलगाव मुकुंद काँक्रीट नाली ३ लक्ष रुपयाचे काम, काँक्रेट रस्ता ४ लक्ष, आणि धानोरा बुद्रुक येथील पाणीपुरवठा ४.७५ लक्ष रुपयाचे काम प्रस्तावित असल्याने ही कामे मंजुरीकरिता पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी ९ डिसेंबर २०२१ ला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शिफारस पत्र दिले होते.
परंतु निधी उपलब्ध नसून ही कामे आज पर्यंत मंजूर करण्यात आलेली नाही. वरील कामे निधी उपलब्ध करून मंजुरात देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.या साखळी उपोषणात मोहन पाटील, रघुनाथ राऊत, तेजराव राऊत, शिवचरण घोंगे, गजानन वनारे ,उद्धव मनसकार, सुभाष मुकुंद, गोकुळ सिंग चव्हाण हे उपस्थित होते.