
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रत्नापूर येथे जि.प.शाळेसमोरील विजेचे खांब,भंगे गुरुजी यांच्या घरासमोरील विजेचे खांब,व गोवर्धन गिरनाळे यांच्या घरासमोरील विजेचे खांब बरेच दिवसांपासून खालून सडलेले (जीर्ण झाले)होते.
प्राप्त माहितीनुसार याच सडलेल्या (जीर्ण) वीज खांबावरून ग्रामस्थांना वीज पुरवठा सुरू होता.याच खांबावरून विद्युत पुरवठा चालू असल्याने ते जीर्ण अवस्थेत असलेले खांब कधी कोसळतील याचा नेम नव्हता.ही समस्या लक्षात घेता कापूसतळणी येथील प्रहार उपतालुकाप्रमुख अरुण शेवाणे यांनी दि.१/११/२०२१ ला उपकार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कंपनी मर्या. अंजनगाव सुर्जी यांना निवेदन देऊन सदर खांब त्वरित नवीन खांब बसून द्यावे.
अन्यथा खांब तुटून हानी झाल्यास त्याची भरपाई वीज वितरण कंपनीकडून वसूल करण्यात येईल.या सदर विषयासंदर्भात पो.स्टे.रहिमापूर चिंचोली यांना सुद्धा कळविण्यात आले होते.तसेच म.रा.वि.वि.कंपनीला निवेदन देऊन इशारा देण्यात आला होता.श्री.खानंदे विद्युत अभियंता,अमरावती यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सडलेल्या (जीर्ण) खांबांचे फोटो दाखवून त्वरित नवीन खांब बसविण्यात यावे अशी विनंती केली होती आणि श्री.खानंदे साहेब यांनी त्वरित नवीन खांब बसून देण्याचे आश्वासन सुद्धा दिले होते व वीज कंपनीच्या अभियंत्यांनी तत्परता दाखवत आज दि.१४-०३-२०२२ रोजी नवीन खांब बसवून नागरिकांचा प्रश्न निकाली काढण्यात आला.