
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
रत्नापूर येथील जीर्ण अवस्थेत असलेले विद्युत खांबांवरून अनेकांच्या घरात वीजपुरवठा चालू स्थितीत होता.मात्र खांब खालून सडल्याने कोसळून जिवीत तसेच आर्थिक हानी होण्याची दाट शक्यता होती.सदर वीज खांब गावात रस्त्याला लागून असून ते अपघातास आमंत्रण देणारे ठरत होते.संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी व जनतेच्या सोयीचा विचार करून मी वीज वितरण कंपनीकडे अपघातास आमंत्रण देणारे खांब काढून त्याजागी नवीन खांब बसविण्यात यावे अशी मागणी/निवेदन दिले.
मी सदर विषयाबद्दल वीज वितरण कंपनी सोबत वेळोवेळी पाठपुरावा तसेच चर्चा करून जर हे खांब आपण वीज कंपनीने तात्काळ न काढल्यास व या कारणाने कोणतीही जिवीत दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार वीज वितरण कंपनी राहील.परंतु आज वीज वितरण कंपनीने जीवित तथा आर्थिक होणारा घटनाक्रम लक्षात घेता धोकादायक तीन ठिकाणावरचे जीर्ण विद्युत खांब काढून त्या जागी नवीन खांब बसविले.
त्यामुळे मी वीज वितरण कंपनीचे आभार मानतो. ₹ह्यामुळे रत्नापुर येथील नागरिकांनी होणाऱ्या घटनेपासून सुटकेचा श्वास घेतला.या यशस्वी कार्याबाबत माझे परिसरातील जनतेने कौतुक सुद्धा केले परंतु हे कार्य यशस्वी होण्यासाठी जनतेचा आशीर्वाद तसाच प्रतिसाद मिळाला म्हणून हे कार्य शक्य होऊ शकले असे अरुण शेवाने यांनी म्हटले.