
दैनिक चालु वार्ता
माळाकोळी प्रतिनिधि
गणेश वाघमारे
लोहा :- लोहा तालुका येथील तालुकास्तरीय गुरु गौरव पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 13 मार्च 2022 रोजी पंचायत समितीच्या वतीने विकी गार्डन पार्डी येथे हा कार्यक्रम ठेवण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सभापती आनंदराव पाटील शिंदे होते , तर कार्यक्रमासाठी उपसभापती नरेंद्र गायकवाड , यांनी खूप मेहनत घेतली सर्व सदस्य दत्ता वाले बालाजीराव पाटील कदम पंचायत समितीचे सर्व सदस्य यांनी खूप मेहनत घेतली , गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के साहेब ,सर्व शिक्षणविस्ताराधिकारी व शिक्षक वृंद यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली आंबेसांगवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या तिन शिक्षकांना यामध्ये पुरस्कार मिळाला.
त्यामध्ये राजकुमार देगलूरकर सर विद्या चव्हाण पाटील मॅडम ,आणिता ढाकणे मॅडम या सर्वांना गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ढाकणे मॅडम अनेक दिवसापासून शैक्षणिक सेवेमध्ये कार्यरत आहे ढाकणे मॅडम अहमदपुर येथून येणेजाणे करत असतात त्यांचे विद्यार्थ्या विषयी असलेले प्रेम आपुलकी,प्रामाणिक तळमळ ,त्यांचे कोरोना काळातील जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी असलेली तळमळ, तसेच 26 जानेवारी असो वा सांस्कृतिक कार्यक्रम या कार्यक्रमांमध्ये त्याने दाखवलेला उस्फूर्त प्रतिसाद त्यांची कला, क्रीडा, सामाजिक कार्यात खूप अग्रेसर असतात आणि त्यांची फलित म्हणून त्यांना आज गुरु गौरव पुरस्कार प्राप्त झाला .
त्यानिमित्ताने सगळीकडेच पालकांमध्ये शाळेमध्ये शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले मॅडम ह्या खूप कष्ट घेतात. त्यानी शिकवण्याचे प्रामाणिक कार्य करतात आणि त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावण्यासाठी नवनवीन शैक्षणिक प्रयोग केले उपक्रम राबवले आणि यात विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागली मॅडमच्या गुणवैशिष्ट्यांमुळे व सर्व स्टाफच्या कार्यामुळे आंबेसांगवी येथील शाळा नावारूपाला आलेली आहे आणि खरोखरच त्यांना तालुका स्तरीय पुरस्कार मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षाताई ठाकूर व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर साहेब, गटशिक्षणाधिकारी साहेब सोनटक्के साहेब, पठाण साहेब आणि लोहा तालुक्यातील सर्व शिक्षक वृंद त्यांचे वडील बालाजीराव ढाकणे व त्यांच्या मातोश्री हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
एकंदरीत मॅडमनी आतापर्यंत केलेली शैक्षणिक सामाजिक कार्य आणि त्यांची कार्याची दखल घेत पंचायत समितीने हा जो गुरूगौरव पुरस्कार दिला त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे मॅडम यांना लवकरच जिल्हास्तरीय पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती होवो हीच सदिच्छा..