
दैनिक चालु वार्ता
एक राशन कार्ड घेण्यासाठी मोजावे लागतात तीनशे ते हजार रुपये*
लोहा प्रतिनिधी
भरत पवार
लोहा :- लोहा तालुक्यातील तहसील येथे पुरवठा विभागात सामान्य माणसांना खूप मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते सामान्य माणसाचं काम एका दिवसात होत नाही पण हजार रुपये दिले तर लगेच एका दिवसात काम होते गोर गरिबाचे हक्काचे राशन कार्ड घेण्यासाठी शासनाने 40 रुपयांचे चलन भरून राशन कार्ड घेता येते असे नमूद केले आहे परंतु लोहा येथील पुरवठा विभागात राशन कार्ड घेण्यासाठी तीनशे ते एक हजार रुपये मोजावे लागतात अशी प्रतिक्रिया प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष गोविंद पाटील वडजे यांनी दिली.
एखाद्या सामान्य शेतकरी माणसाचा पुरवठा विभागामध्ये आज आला तर एकावेळेस कधीच काम होत नाही त्या कामासाठी चार ते पाच वेळेस सर्व कामधंदे सोडून पुरवठा विभागात चकरा माराव्या लागतात एवढे असताना सुद्धा अर्ज दिल्यानंतर कोणतीही पोचपावती दिली जात नाही कारण कधीकाळी घोळ झाला तर आमच्याकडे तुमचा अर्ज आलाच नाही असं म्हणण्यास पुरवठा विभाग मोकळा पुरवठा विभागात कधी पण जा राशन कार्ड उपलब्धच नाही असे अधिकारी सांगतात परंतु दलालामार्फत 1000 रुपये दिले असता एका दिवसात राशन कार्ड मिळते.
एखादे कार्ड ऑनलाइन झाल्यानंतर कार्ड वर नाव टाकण्यासाठी खाजगी महिला कर्मचारी यांच्या माध्यमातून शंभर रुपये देऊन नाव टाकण्यासाठी विभागातील पेशकर हा कर्मचारी सांगतो कोणतेही कार्ड हे शासकीय कर्मचारी स्वीकारत नाहीत राशन कार्ड मध्ये नाव समाविष्ट करायचे असल्यास किंवा काढायचे असल्यास किंवा नवीन राशन कार्ड अर्ज केला असता हे अधिकारी कोणतीही पोचपावती न देता कार्यालयात आलेल्या सामान्य माणसाला लुटण्यासाठी खाजगी व्यक्ती कडे जमा करा असं सांगतात ते काम कधी होईल याची गॅरंटी नाही पुरवठा कार्यालयात ठरलेली बेकायदेशिर रक्कम दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही हे काम होण्यासाठी दोन-तीन महिने लागतात.
काही वेळेस तर त्या कामाचे अर्जच गायब होतात परंतु कार्यालयात बेकायदेशीर ठरवलेली रक्कम ठराविक माणसाच्या हातात दिली असता त्या माणसाचे काम तात्काळ करून दिले जाते हे एवढे सगळे मला माहित असताना व माझ्याकडे पुरावे सुद्धा आहेत परंतु मी वरिष्ठ कार्यालयाकडे कोणतीही तक्रार करून माझा वेळ वाया घालणार नाही कारण सर्व प्रशासन संगनमताने काम करीत आहे याचा मला अनुभव आहे असं मत प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष गोविंद पाटील वडजे यांनी मांडल.
या सर्व प्रकरणाची सर्व माहिती पुरवठा विभागात होत असलेला दलालांमार्फत चा कारभार या सर्व बाबी मी प्रत्यक्ष तशिलदार साहेब यांना भेटून दिली आहे या प्रकरणाला किमान एक वर्ष पूर्ण झाली आहे परंतु या बाबीकडे कोणताही प्रशासकीय अधिकारी लक्ष देत नाही यासाठी पुरवठा विभागाने स्वतंत्र आवक जावक विभाग चालू करावा.