
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून भाजप सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. त्याचा निकाल येत्या दोन – तीन दिवसात लागेल. त्यानंतर याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडला जाणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. मुंबई – राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होऊन तिसरा आठवडा सुरू झाला तरी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक अजून झालेली नाही. या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकार गंभीर असून, राज्यपाल त्यास दुजोरा देत नाहीत. या कारणास्तव नाना पटोले यांनी राज्यपालांवर टीका केली आहे.