दैनिक चालु वार्ता
नांदुरा प्रतिनिधी
किशोर वाकोडे
खामगाव :- दि. १५.अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या ऑटोला खामगाव येथील अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने पकडले असल्याची घटना दि. 15 मार्च रोजी सकाळच्या सुमारास पहूरजिरा- मोरगाव रोडवर घडली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतचे वृत्त असे की,होळीचा सण असल्यामुळे शहरी भागातून ग्रामीण भागातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या देशी दारू जाणार असल्याची गोपनीय माहिती खामगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, यांना मिळाली.
त्यामुळे त्यांनी विशेष पथकाला माहिती दिली त्यावरून विशेष पथकाने सापळा रचून पहूरजिरा- मोरगाव रस्त्यावर अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणारा ऑटो क्र.(MH -२८,T -१०७४) मंध्ये असलेला परमेश्वर श्रीकृष्ण लाहुडकार रा. पारखेड याला रंगेहात पकडले व त्याच्या जवळून देशी दारूचे १६ बॉक्स किंमत ४८ हजार रुपये, ऑटो १ लाख रुपये, एक मोबाईल असा एकूण १ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई खामगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकातील कर्मचारी पो.हे.का. गजानन बोरसे, ना.पो.का. गजानन आहेर, संदीप टाकसाळ यांनी केली आहे.