
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा तालुक्यातील मनसे पदाधिकाऱ्यांची निवडी जाहिर
नांदेड :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लोहा तालुक्यात गावपातळीवरील विस्तार करून पदाधिकाऱ्यांनी शाखा स्थापन कराव्यात असे प्रतिपादन मनसेचे लोहा तालुका अध्यक्ष रोहित कटकमोड यांनी लोहा येथे शासकीय विश्रामगृहात मनसेच्या लोहा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या बैठकीत केले. लोहा येथील शासकीय विश्रामगृहात मनसे चे लोहा तालुका अध्यक्ष रोहित कटकमोड यांच्या अध्यक्षतेखाली मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसेचे लोहा तालुका अध्यक्ष रोहित कटकमोड यांनी मनसेच्या लोहा तालुक्यातील कार्यकारिणी चा विस्तार करुन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहिर करुन नियुक्ती पत्र पुढीलप्रमाणे दिले आहे.
मनसे लोहा तालुका उपाध्यक्ष – मंथन बाबर (आष्टूर), मनसे लोहा शहराध्यक्ष — गणेश चव्हाण (लोहा ), मनसे लोहा उपशहराध्यक्ष चंद्रकांत दमकोंडवार, मनसे लोहा तालुका उपाध्यक्ष -विजय मोरे (निळा), मनसे विद्यार्थी सेना लोहा तालुका अध्यक्ष – गणराज केंद्रे (लोहा ), मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष — अमोल पाटील पवार ( पारडी), मनसे विद्यार्थी सेना तालुका उपाध्यक्ष — महेश जकवाड, आदी पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहिर करुन नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी नारायण बाबर,सतीश बाबर, हनमंत लुंगारे, शंकर यरमुणवाड,मोहन लुंगारे,किरण डिकळे,नंदु पंदलवाड, आकाश बनसोडे, आदी उपस्थित होते.