
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- जि.प.स्थायी समितीकडून शिक्षक संघटनांची मागणी सर्वानुमते मान्य. उन्हाची वाढती तिव्रता, अनेक शाळांत पंखे व विद्युतीकरणाचा अभाव, बस संपामुळे उन्हात विद्यार्थ्यांची होणारी होरपळ थांबविण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उद्यापासुन नांदेड जिल्हयातील शाळा सकाळ सत्रात सकाळी ९ ते १ भरविण्याच्या सर्व शिक्षक संघटनांची मागणी नांदेड जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत बैठकीच्या अध्यक्षा तथा नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा.सौ.मंगाराणी अंबुलगेकर, नांदेड जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा.सौ.वर्षा ठाकुर-घुगे, शिक्षण सभापती मा.संजयजी बेळगे, समाज कल्याण सभापती मा.रामराव नाईक, कृषि सभापती मा.बाळासाहेब रावणगावकर , महिला व बालकल्याण सभापती मा.सौ.सुशिलाताई बेटमोगरेकर व सर्व विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत सर्वानुमते मान्य करण्यात आली.
यावेळी सर्व संघटनांचे प्रतिनिधी म्हणुन अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष मा.देविदासराव बसवदे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष मा.मधुकराव उन्हाळे, इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन (इब्टा) महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे केंद्रीय नांदेड जिल्हाध्यक्ष मा.बालासाहेब लोणे, शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष मा.व्यंकट गंडपवाड हे सर्व संघटनांचे प्रतिनिधी म्हणून प्रमुख उपस्थिती होती. नांदेड जिल्हयातील विद्यार्थी, शिक्षक व पालकांची मागणी नांदेड नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा.सौ.मंगाराणी अंबुलगेकर, नांदेड जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा.सौ.वर्षा ठाकुर-घुगे, शिक्षण सभापती मा.संजयजी बेळगे, समाज कल्याण सभापती मा.रामराव नाईक, कृषि सभापती मा.बाळासाहेब रावणगावकर , महिला व बालकल्याण सभापती मा.सौ.सुशिलाताई बेटमोगरेकर, सर्व जि.प.पदाधिकारी व अधिकारी यांनी सर्वानुमते मान्य करून दिलासा दिल्याबद्दल अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष मा.देविदासराव बसवदे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष मा.मधुकराव उन्हाळे, इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन (इब्टा) महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे केंद्रीय नांदेड जिल्हाध्यक्ष मा.बालासाहेब लोणे, शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष मा.व्यंकट गंडपवाड आदींनी सर्व अधिकारी पदाधिकारी यांचे आभार मानले. या कामी शिक्षण सभापती मा.संजयजी बेळगे,