
दैनिक चालु वार्ता
पालघर प्रतिनिधी
अनंता टोपले
जव्हार :- दिव्य विद्यालय गुलमोहर अंध मुलांची निवासी शाळा जव्हार या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आज दिनांक 14 मार्च 2022 रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आले प्रथम सरस्वती आराधना करण्यात आली व स्वागत गीताने कार्यक्रमास सुरुवात केली विशेष म्हणजे 5 वि ते 7 वी च्या विद्यार्थ्यांनी शुभेच्छा समारंभाचे आयोजन केले व शिक्षक वृद ही सहभागी झाले आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपले मनोगत व्यक्त केले व सर्वांनी शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली शिक्षना बरोबरच सर्वंगीन विकास साधण्यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम सहल ,संगणक प्रशिक्षण,ब्रेल वाचन लेखन ब्रेल वाचन लेखन अवगत केल्यामुळे आम्हाला अवांतर वाचनही करण्याची संधी उपलब्ध झाली, संगीत, नृत्य,खेळ, विविध स्पर्धा या माध्यमातून विकास झाला हेही विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात मांडले.