
दैनिक चालु वार्ता
जव्हार प्रतिनिधी
दिपक काकरा
जव्हार :- राष्ट्रीय नेट परीक्षेत पालघर येथील रहिवासी असलेली श्वेता विश्वनाथ पाटील हीने ९९.९५ टक्के गुण मिळवून इतिहास रचला आहे.जिल्ह्यातील मूळची पालघरची रहिवासी असलेल्या श्वेताने पालघर जिल्ह्याचे नाव देशपातळीवर पोहोचवण्याची सोनेरी किमया साधली.आपल्या मेहनतीच्या जोरावर तिने देशभरातून टॉप ०५ मध्ये आपले स्थान मिळवून ती यशस्वीरित्या उत्तीर्ण झाली आहे.
जिल्ह्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिने या मिळवलेल्या यशाबद्दल पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढान यांनी श्वेताचा शाल व पुस्तक देऊन देऊन यथोचित सन्मान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या सत्कार प्रसंगी पालघर जिल्हा परिषद सदस्या विनया पाटील,तालुकाप्रमुख विकास मोरे,युवा सेनेचे अमेय पाटील उपस्थित होते.