
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- बॉलिवूड अभिनेता अमिर खानचा काल 14 मार्च रोजी वाढदिवस होता. त्याने त्याचा 57 वा वाढदिवस मीडिया टीमबरोबर साजरा केला असल्याचं समजतं आहे. BirthDay सेलिब्रेशनचा अमिरचा व्हिडीओ सोशल मीडियावरही खूप व्हायरल झाला आहे. केक कापल्यानंतर अमिरने माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्याने आपल्या मनात असलेली खंत व्यक्त केली.
अमिरने सांगितले की, मी माझ्या कुटुंबाला हलक्यामध्ये घेतलं.
कुठे तरी मला हे वाटतं की, मी माझ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या नाहीत. माझे आई – वडील, बहिण – भाऊ आहे. रिनाही आहे. तसेच पहिली पत्नी किरण आणि माझी मूलं, हे सगळे माझ्या खूप जवळची लोक आहेत.
मी हे त्यावेळेचं सांगतोय, ज्यावेळी मी 18 वर्षांचा होतो. तेव्हा मी चित्रपटांच्या दुनियेत आलो होतो. त्यावेळी मी मला काही तरी करायचं आहे या विचाराने. त्या विश्वामध्ये इतका रंगुन गेलो.
परंतू मला आता असं वाटतं आहे की, जी लोक माझ्या खूप जवळ होती मी त्यांनाच वेळ देऊ शकलो नसल्याची खंत अमिरने व्यक्त केली. तसेच अमिरचा व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये त्याने पांढऱ्या रंगाचा टि – शर्ट आणि त्यावर गुलाबी रंगाचा शर्ट घातला असून खाली निळ्या रंगाची पॅन्ट घातली असल्याचं पाहायला मिळतं आहे.