
दैनिक चालु वार्ता
जव्हार प्रतिनिधी
दिपक काकरा
जव्हार :- तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या पिंपळशेत हेदिचापाडा येथील यमुना वळंबा या विधवा महिलाच्या घराला अचानक आग लागली.या आगीत महिलेचे घर पूर्णतः जळून खाक झाले.यमुना ह्या स्थानिक रहिवासी असून तिच्या घराला अचानक आग लागल्याने या आगीत आपल्या पोटासाठी साठवलेले अन्नधान्य,पैसे,कपडे आणि आपल्या जीवना आवश्यक साठवलेल्या सामानचेही प्रचंड नुकसान झाले.दरम्यान आग लागल्याचे समजताच गावातील नागरिकांनी ताबडतोब पेटत्या घराकडे धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
या आगीची माहिती मिळताच युवा आदिवासी संघाचे अध्यक्ष दिनेश जाधव व युवा कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ताबडतोब पिंपळशेत विभागाचे तलाठी आणि ग्रामसेवक यांना फोन करून घडलेल्या भीषण आगीची माहिती दिली व त्यांनी पंचनामा करण्याची मागणी करून विधवा महिलेला तिच्या झालेल्या नुकसानाची कशी मदत करता येईल याची मागणी केली.