
दैनिक चालु वार्ता
जळकोट प्रतिनिधी
जळकोट दि.१५ :- ग्राहक संरक्षण कायदा हा ग्राहकांच्या हितासाठी तयार करण्यात आला आहे. या कायद्यान्वये ग्राहकांना सहा प्रकारचे अधिकार दिले आहेत. वस्तु व सेवा घेतांना जागृत राहणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन जळकोट तहसिलदार सौ.सुरेखा स्वामी यांनी बुधवारी (दि.१५) केले. तहसील कार्यालयाच्या सभागृहात जागतिक ग्राहकदिनाचे औचित्य साधून ग्राहक प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी तहसिलदार सौ.सुरेखा स्वामी होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून संभाजीराव केंद्रे महाविद्यालय जळकोट चे प्राचार्य बी.टी.लहाने होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे लातूर जिल्हा संघटक संजय ऊर्फ बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, जळकोट तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय पवार ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे डॉ.रामकृष्ण मोठे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून अँड.श्यामसुंदर गवळे, हावगीस्वामी महाविद्यालय उदगीरचे प्रा.अमित कवठाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जळकोट तालुकाध्यक्ष अर्जुन आगलावे, संगायोचे चेअरमन संग्राम हासुळे पाटील हे उपस्थित होते.
सुरुवातीला ग्राहक चळवळीचे आधारस्तंभ स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलित करण्यात आले.
तहसील प्रशासनाच्या वतीने उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना अँड.श्यामसुंदर गवळे, प्रा.अमित कवठाळे म्हणाले की, ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या ग्राहकांनी आपलीं फसवणूक होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. जो आपण व्यवहार करत तो व्यवहार पक्क्या पावती घेवून करावा. जर फसवणूक झाली तर उचित ठिकाणी दाद मागावी. या ग्राहक संरक्षण कायद्याची व्यापक प्रमाणात जनजागृतीची गरज आहे.असे सांगितले. तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य चे लातूर जिल्हासंघटक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनात्मक ग्रामीण पातळीवर करण्यात येत असलेल्या ग्राहक जनजागरण व जाणीव जागृतीपर माहिती सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जागतिक ग्राहक हक्क दिनांचे उत्कृष्ट नियोजनबद्ध महसूल पुरवठा निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार राजा खरात, अव्वल कारकून शिवराज एम्पल्ले, मुसळे सर यांनी केले. तर आभार नायब तहसिलदार जी.एल.खरात यांनी मानले. यावेळी रास्ता भाव दुकानदार संघटनेचे पदाधिकाऱ्यांसह, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकाऱ्यांसह, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.