
दैनिक चालु वार्ता
रायगड म्हसळा प्रतिनिधी
अंगद कांबळे
रायगड म्हसळा :- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग संघटना रायगड जिल्ह्याचा मेळावा माणगाव येथे १२/०३/२०२२ रोजी संघटनेचे राज्याध्यक्ष श्री राजेश सुर्वे साहेब ,राज्य प्रतिनिधी श्री भगवान घरत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री संजय निजापकर,जिल्हा कार्यवाह श्री विजय पवार,कार्यालयीन मंत्री श्री वैभव कांबळे,कार्यालयीन चिटणीस श्री जितेंद्र बोडके,माणगाव तालुका शिक्षक परिषदेचे अध्यक्ष श्री गणेश निजापकर व संघटनेचे जिल्ह्यातील१५तालुक्यातील ५०० सभासद शिक्षक बंधू,व जिल्हा व तालुका संघटना पदाधिकारी बंधूभगिनी या मेळाव्यास उपस्थित होते.
तसेच माणगाव पंचायत समितीच्या सभापती,गटशिक्षणाधिकारी, व संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रमुख सौ दीप्ती गावंड,सौ पूजा शहा,सौ संगीता कांबळे , सौ संगीता बारगजे याही या मेळाव्यात उपस्थित होत्या संघटनेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकबंधूंना शिक्षकरत्न आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. म्हसळा तालुक्यातून रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साळवींडे शाळेचे शिक्षक श्री गणेश अंबादास अकोलकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याबद्दल तालुक्यातील शिक्षक परिषद संघटनेचे अध्यक्ष श्री नितिन मालिपरगे,कार्यवाह श्री अशोक सहाणे,कार्यवाह श्री प्रशांत मोरे,कोषाध्यक्ष श्री एजाज सय्यद,उपाध्यक्ष श्री संतोष मळगे आप्पा,पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी चे संचालक श्री नितिन गर्जे ,जुनी पेन्शन हक्क संघटन चे अध्यक्ष श्री महेश राव,संघटनेचे संघटक श्री साळकर,श्री महेश फुलझळके,श्री संगमेश्वर गुडडा, श्री संतोष चव्हाण,श्री प्रदीप बिराजदार,श्री वसंत बिराजदार ,श्री प्रदीप नाईक व तालुक्यातील सर्व सभासद मंडळी यांनी स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या*