
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
सांकेतिक धुळवड
मनात उधळू रंग
जाळून दुष्ट विचार
उजळू या अंतरंग
यंदा दुरून भेटी
नको प्रत्यक्ष संग
नेट वरती शुभेच्छा
सुख स्नेहाचे तरंग
कोरोनाची दहशत
करील रंगात भंग
प्रवेश अडवू त्याचा
करुया आपण चंग
वैर भाव दग्ध करी
नाती दोस्ती अभंग
सुविचार विनिमय
गाऊ किर्तन अभंग
बचतहोई पाण्याची
उठेलं आनंद तरंग
सणआनंदाचा क्षण
का ठेवायचे व्यंग
– हेमंत मुसरीफ पुणे.
www.kavyakusum.com