
दैनिक चालु वार्ता
मुखेड ता.प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
मुखेड :- मौजे सलगरा खुर्द ता. मुखेड जि. नांदेड येथे दि. १५/०३/२०२२ रोजी स्वच्छ भारत मिशन टप्पा २ अंतर्गत घन कचरा व सांड पाणी व्यवस्थापन कामाचे उदघाटन मा. भालके साहेब गटविकास अधिकारी, यांच्या हस्ते झाले असुन ग्रामपंचायत येथे मान्यवरांचा शाल व श्रीफळ देवुन सन्मान करण्यात आला गटविकास अधिकारी भालके साहेब, थोडक्यात आपले विचार मांडले, स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत कचरा विलेव्हाट लावण्या साठी चौका चौकात कचरा कुंडी ची व्यवस्था करने व कुंडीत कचरा टाकण्या साठी घंटा गाडी ची व्यवस्था करण्यात येनार आहे.
तसेच रस्त्याने जानारे पाणी व घरातील सांड पाण्या साठी शौच खड्डे निर्माण करुण पाणी खड्यात सोडुन भविष्यात पाण्याची पातळी वाढवण्या साठी जमिनीत जिरवण्यात येणार आहे घरा घरात संडास उपलब्ध असुन बाहेर गावाहुन येणार्या साठी सार्वजनिक संडास उपलब्ध करण्यात येईल असे विचार मांडले. उपस्थित मा. येवते सर विस्तार अधिकारी, मा. नरगुडे सर जे. ई. मा. के. के. पवार सरपंच प्रतिनिधी, मा. शेख. गौसअली सलगरकर उपसरपंच, मा. बालाजी सुर्यकार ग्रामसेवक, मा. राजीव मेकलवाड अध्यक्ष शालेय शिक्षण समिती, मा. यशवंत घायाळे व ईतर गावकरी ऊपस्थित होते.