
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मा,संपादकसो,
आज होळीचा आलाया सण
नाचू ,गाऊया ,रंगू या सारेजन….!!धृं!!
अघोरी प्रथेची पेटवूया होळी
जाळात नको ती वाटूया पोळी
साजरी होळी करू,देऊया दान
नाचू, गाऊया, रंगू,या सारेजन….!!१!!
भक्त प्रल्हादाची होती भक्ती
देव विष्णू भगवानाची शक्ती
भक्तीभावाने, सारे करू पुजन
नाचू ,गाऊया, रंगू या सारेजन…..!!२!!
नका झांडांची करू कत्तल्ल
ऱ्हास निसर्गाचा मग होईल
सण होळीचा झाडं लावू नवीन
नाचू, गाऊया, रंगू या सारेजन…!!३!!
वाईट ,वंगाळ बोलनं टाळा
वैरवादाला घालूया आळा
राहूया सारे एकदिलांनं.
नाचू,गाऊया,रंगू, या सारेजन…..!!४!!
कवी सरकार इंगळी ता.हातकणंगले