
दैनिक चालु वार्ता
गंगाखेड प्रतिनिधी
गंगाखेड :- गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार डॉ. रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांनी आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संस्कृती कार्य मंत्री मा.ना. अमितजी देशमुख साहेब यांची आज मुंबई येथे भेट घेऊन गंगाखेड तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू असलेले धारासुर येथील गुप्तेश्वर मंदिर जीर्णोद्धाराच्या प्रस्तावास तात्काळ मंजरी देऊन गुप्तेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करावा अशी मागणी आमदार गुट्टे साहेबांनी केली.
तात्काळमा.ना. अमित देशमुख साहेबांनी याबाबतचा अहवाल तात्काळ आश्वासन देऊन सदरील प्रकरण तात्काळ निकाली काढून मा.ना.अमित देशमुख साहेब मंत्री महोदयांनी सांस्कृतिक विभागाच्या सचिवांना निर्देश दिले. त्यामुळे मौजे धारासुर येथील गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.