
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
पुणे, दि. 16: केंद्र शासनाचा प्राणी क्लेष प्रतिबंधक कायदा – 1960 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित ‘प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी’ वर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्तीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाकडे 29 मार्च 2022 पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी केले आहे.
या संस्थेवरील अशासकीय सदस्यांचा कार्यकाल संपल्यामुळे प्रस्ताव मागवण्यात आले असून 10 ते 11 अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
संबंधित जिल्ह्यातील गोशाळा, पांजरापोळ संस्थांपैकी एका संस्थेचा अध्यक्ष, प्राणी कल्याणविषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे दोन सदस्य, सर्वसाधारण समितीने नामनिर्देशित केलेल्या दोन व्यक्ती, संबंधित जिल्ह्यातील मानवहीतकारक कार्य करणारे, प्राण्यांवर प्रेम करणारे, प्राणी कल्याणासाठी काम करणारे पाच ते सहा कार्यकर्ते या चार क्षेत्रातील व्यक्तींची शिफारस असणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना, पंचायत समितीचा पशुसंवर्धन विभाग, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे आणि जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, खडकी, पुणे – 03 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त तथा सदस्य सचिव प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी, पुणे यांनी केले आहे.